बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली अन्…’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पत्र चर्चेत

मुंबई | शिवसेना दैनंदिनीच्या माध्यमातून शिवसैनिकाच्या घरोघरी पोहचलेले आणि निष्ठावंत शिवसैनिक शरद पवार यांचं शुक्रवारी कोरोना आजाराने निधन झालं. शिवसेनेचे कार्यकर्ते शरद पवार हे ‘शिवसेना दैनंदिनी’ चे प्रणेते होते. त्यांच्या अचानक जाण्यानं शिवसेना कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या जवळचे मानले जात होते. अरविंद सावंत यांनी शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

शरदचा चटका लावणारा अस्त ! आमच्या लोकाधिकारचा एक तारा शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली आणि मी निःशब्द झालो. गेली अनेक वर्षे हा साहेबांचा कडवट शिवसैनिक लोकाधिकारच्या चळवळीत झोकून देऊन काम करत होता. पण शरद पवार आणि जी एस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती शिवसेना दैनंदिनीची, असं अरविंद सावंत यांनी पत्रात लिहिलं आहे.

‘अलीकडच्या काळात माझ्या कार्यालयात अनेकदा येऊन गेला. शरद एकदा त्याच्या चिरंजीवाला घेऊन आला. म्हटलं काय काम आहे का? नाही साहेब, तुमचा फॅन आहे म्हणून घेऊन आलो. माझ्याकडून काही योग्य घडलं, किंवा चांगला प्रतिवाद करताना दूरदर्शन वर पहिले की त्याचा फोन आलाच. असा हा शरद…’, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोनात सारे कुटुंबच अडकले आहेत. पत्नी आणि तो एकाच हॉस्पिटलमध्ये होते. पण ती गेल्याचा मागमुसही त्याला नव्हता. काल परवा सेव्हन हिल हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा त्याचा मुलगा भेटला. मला वाटलं आता शरद नक्की बरा होऊन घरी येईल. पण कसचं काय आणि अखेर आज तोही सोडून गेला तेही अक्षय तृतीयेला!, शिवसेनाप्रमुखांच्या एका निष्ठावंत शिवसैनिकांचा शरीररूपी क्षय झाला पण अक्षय स्मरणात राहील, असं सावंत पत्रात म्हणाले.

पाहा पत्र-

 

थोडक्यात बातम्या-

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More