मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार आणि अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले याचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे.
आपल्या वैयक्तिक कामासाठी मोहन रावले गोव्यामध्ये गेले होते. तिथे त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
मोहन रावले पाच वेळा खासदार राहिले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. सर्वसामान्याचे नेते आणि परळ ब्रँड अशी त्यांची ओळख होती.
दरम्यान, कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. “परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या
पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवार
“अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळे त्यावर त्यांनी स्वत:च लेबल लावू नये”
“नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना भारताने काय केलं?”
“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”