बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”

बुलडाणा |  राज्यात आरक्षणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आता ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवरमधील शिवसेनेवर हल्ला चढवला होता. बावनकुळेंच्या या टीकेला शिवेसना खासदार प्रतापराव जाधव यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

बावनकुळे हे आता शिवसेनाविरोधात गरळ ओकून पक्षात आपलं महत्व वाढवण्याचा आटापिटा करत आहेत. मात्र बावनकुळेंनी सत्तेत असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांचं तिकीटच कापलं, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला हा बावनकुळेंचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रतापराव जाधव म्हणाले.

निवडणुकीपूर्वी समान जागांचा फॉर्म्युला ठरला होता त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले नव्हते. तर अमित शहा स्वत: मातोश्रीवर आले होते, असं असताना भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे केले. खरं तर भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असा पलटवार जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, मागील निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत युती केली आणि लढवली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्याचा उपयोग करून घेण्यासाठी  शिवसेना आमच्यासोबत होती. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

थोडक्यात बातम्या- 

43 वेळा कोरोना पाॅझिटिव्ह! 72 वर्षीय आजोबांनी अशी केली कोरोनावर मात

राज्य सहकारी बँकेचा नफा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्क्यांनी वाढला

11 वीच्या प्रवेशाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र अनलॉक मात्र ‘या’ जिल्ह्याची चिंता वाढली; एका दिवसात आढळले तब्बल 695 रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More