महाराष्ट्र मुंबई

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

मुंबई | ऑक्टोबरपर्यंत वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोकमधून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून भाजापवर घणाघाती टीका केली आहे. विधान परिषदेवर राज्यपालांच्या सहीने 12 जणांची नेमणूक होईल, पण सध्याचे राज्यपाल या नेमणुका करण्यास अनुकूल नाहीत, असं वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झालं. ते चिंताजनक आहे, असं राऊतांनी म्हटलंय.

12 सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान ,सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असंही राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता…, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा

महत्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

कोरोनाचा फास आवळला! भारत ‘या’ देशाला मागे टाकत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर…

पुण्यातील भाजपच्या या माजी आमदाराला कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या