बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचे सरकारला पुर्ण आशिर्वाद, हे सरकार 5 वर्ष चालेल- संजय राऊत

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. शरद पवार यांचे सरकारला पुर्ण आशिर्वाद असून, हे सरकार पुर्ण 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सिल्वर ओकवर बोलवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले आहे. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले.

दरम्यान, मराठा आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण , काँग्रेसची नाराजी आणि मंत्रीमंडळ बैठकीत मंत्र्यांचे वाद या मुद्यावरून शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांची शाळा घेण्याची शक्यता आहे. तर मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात देखील चर्चा होत आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

“सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा धोका वाढला; गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More