बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये”

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यातच आता राजकीय टीका टिप्पणी चालू झाल्यानं राजकारण तापू लागलं आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या होत असून सर्वाधिक करोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्राला अधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसं मिळतं हा गंभीर प्रश्न आहे. भाजपमधील राजकीय शुक्राचार्यांनी संकटाच्या प्रसंगात महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळू नये, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार सर्व जबाबदारी आता राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत, त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच यापेक्षा जास्त आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं सांगितलेलं असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जातेय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर न्यायालयाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सांगाव्यात. न्यायमूर्ती वेगाने ऑक्सिजन प्लाॅटची निर्मिती करु शकतात का?, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

“18 वर्षापुढील सर्वांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करावा”

“रेमडेसिविर, ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण बरे होतायेत”

“संकट मोठं आहे, तुमचं तुम्ही बघा, काळजी घ्या…”

‘महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी ?’; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला सवाल

नाशिकच्या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग; महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More