महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

मुंबई |  विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. परंतू आता विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील आमदार म्हणून निवड झाल्याने हा वाद शमला आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला पोहचले आहेत.

राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली, असं संजय राऊत यांनी या भेटीनंतर सांगितलं आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राप्रमाणे त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे. विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

 आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं

निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या