महाराष्ट्र मुंबई

“राज्याला केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही”

मुंबई | राज्याला केंद्र सरकारकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही. श्रमिक मजुरांना रेल्वेनं त्यांच्या मूळ गावी पाठवण्यावरून काही वाद होते. त्याव्यतिरिक्त अन्य काही वाद नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा सुरू असते. तसंच मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनही मिळत असतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

सध्या विद्यमान सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे आणि त्यांना एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या एका वर्षांच्या कामावर टीका करणं योग्य नाही. गेल्या वर्षभरात काही चांगली कामंही झाली. गेले काही महिने आता कोरोनाचं संकटही आपल्यावर आलं आहे. पण सरकारच्या मागील कार्याकाळापासून सुरू असलेलं अर्थव्यवस्थेवरील संकट आताही कायम आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आम्ही सरकारसोबत नव्हतो तेव्हाही आम्ही कलम 370 हटवण्यावरून त्यांनी साहसी निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. आम्ही चमचेगीरीची गोष्ट कधीही केली नाही. जे चांगलं आहे ते आम्ही मान्य केलं, असं राऊत म्हणाले.

 ट्रेंडिंग बातम्या-

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस

वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी- देवेंद्र फडणवीस

दिल्ली कोरोनाच्या चार पावलं पुढे आहे- अरविंद केजरीवाल

“राहुल गांधी यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या