बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर राज्यातील विरोधीपक्षाने महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सजंय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते सिल्वासामध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत होते.

महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्तच निर्माण झालं आहे, हे मला तर माहितीच नाही. काही लोक गांजा मारून काम करताना दिसत आहे. दसरा मेळव्यानंतर असला प्रकार मला वारंवार दिसतंय, विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते नेमकी काय मारतात का? त्यांना कुणी पुरवतं का? इतक्या बेधुंदपणे कुणी कारभार करू शकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लागवला.

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत 22 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी कलाबेन यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या संजय राऊत सिल्वासामध्ये प्रचारासाठी दाखल झाले.

दरम्यान, शिवसेेनेच्या दसऱ्या मेळव्यात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षावर निशाणा साधला होता. त्यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या- 

रामलीला सुरु असताना राम नामाच्या गजरात दशरथने मंचावरच सोडले प्राण, प्रेक्षकांना वाटला अभिनय

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More