बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीमुळं उद्भवला शिवसेना-राष्ट्रवादी वाद; अखेर बाबांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

रायगड | कोकणच्या समृद्ध प्रदेशात निसर्गानं सौंदर्यांची चौफेर उधळण केली आहे. कोकणची माती पर्यटन आणि राजकारण दोन्हींसाठी प्रसिद्ध आहे. कोकणात शिवसेना आणि राष्ट्रावादीमध्ये वर्चस्वासाठी होणारं जोरदार भांडण अवघ्या राज्यानं पाहिलंय. अशात आता रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यक्षैलीमुळं शिवसेनेची चिंता वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. या तीनही आमदारांनी आदिती तटकरे यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली आहे. आदिती या आम्हाला सोबत घेऊन कोणतंही काम करत नाहीत. कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदारांना योग्य सन्मान दिला जात नाही. परिणामी त्यांना पालकमंत्रीपदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या तीनही आमदारांनी केली आहे.

आमदारांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आदिती ही सर्वांना घेऊन काम करत आहे. असं असलं तरी आमदारांच्या या भूमिकेमागे महाविकास आघाडीतील एक बडा नेता असल्याचं वक्तव्य तटकरे यांनी केलं आहे. परिणामी आता कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादीचा फक्त एक आमदार आहे. केवळ एक आमदार असताना त्यांना पालकमंत्रीपद देण्याऐवजी शिवसेनेच्या मंत्र्याकडे रायगडची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली’, किरीट सोमय्यांच्या दाव्याने नवी खळबळ

ऐतिहासिक निर्णय, अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील तब्बल ‘इतक्या’ दोषींना फाशीची शिक्षा

‘सगळे हिशेब ह्याच जन्मात चुकते करणार’, निलेश राणेंची तोफ कडाडली

‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; मराठमोळ्या गायिकेचा धक्कादायक खुलासा

“वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहे, जेलमधे जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More