बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेना विरूद्ध शिंदे गटात वादाची नवी ठिणगी

मुंबई | राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यपदासाठीच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानभवनातील (Vidhan Bhavan) शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. एकऩाथ शिंदे गट विरूद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा वाद सुरू आहे. अशात विधानसभा अध्यपदासाठीच्या निवडणुकीसाठी राजन साळवी विरूद्ध राहूल नार्वेकर अशी लढत आहे.

विधानसभा अध्यपदासाठीच्या निवडणुकीसाठी दोन व्हीप जाहिर करण्यात आले आहेत. शिंदे गटातून भरत गोगावले यांनी भाजपचे राहूल नार्वेकर यांना मत देण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटातून सुनिल प्रभू यांनी राजन साळवी यांना मत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधानसभा अध्यपदासाठीच्या निवडणुकीवेळी शिवसेना कार्यालय सील करण्यात आल्यान नवा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना गटाने नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात सेना नेत्यांची बैठक घेतली.

थोडक्यात बातम्या

‘…तर एकनाथ शिंदे यांनी हे आधीच केलं असतं’; जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी

‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”

शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More