बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना रेसचा घोडा, घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट”

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी संजय राऊत यांनी भोसरीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर पुण्यातील वडगावशेरीत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणतात मला माजी मंत्री म्हणू नका, चंद्रकांत पाटील माझे जुने मित्र आहे म्हणून मी त्याच्यावर फक्त सव्वा रूपयाचा दावा केला आणि तो सव्वा रूपया जाहिर पणे घेणारच, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना रेसचा घोडा आहे आणि घोडे लावण्यात आम्ही एक्स्पर्ट आहे लोक माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात. विरोधकांनी कितीही आपटली कितीही स्वप्न पाहली तरीही 2024 नंतर देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होणार, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे सरकार आव्हान देणाऱ्यासाठी ठोक-रे सरकार आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. युती आणि आघाडीत भांड्याला भांडं लागायला नको असं वाटत असेल तर 150 जागा निवडून आणा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

” मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील तो आवाज माझा नाहीच”

“शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”

“प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, ते फक्त भाजप आणि आरएसएसचे नाहीत”

‘मोदींजीना बोलवा, तरच मी लस घेईल’; पठ्ठ्याच्या मागणीनं अधिकाऱ्यांना फुटला घाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More