Top News महाराष्ट्र मुंबई

‘अल्प बुद्धी दिसतेच आहे’; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

मुंबई | कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा ही आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला होता. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

फडणवीसांनी दिल्लीच्या नादाला लागून महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता, वर्षभरापासून तो पूर्वपदावर येतोय, असा खोचक टोला शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी लगावला आहे.

हा प्रश्न देवेंद्रजीना विचारला असता तर बरं झालं असतं. दिल्लीच्या नादाला लागून त्यांनी महाराष्ट्र गुजरातला न्यायचा प्रयत्न केला होता. वर्षभरापासून तो पूर्वपदावर येत आहे. काळजी नसावी. बाकी अल्प बुद्धी दिसतेच आहे, अशी खोचक टीका यामिनी जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

 

 

महत्वाच्या बातम्या-

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”

कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य

कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या