मुंबई | भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन आज सभापतींनी अचानक मागे घेतल्यामुळे विरोधी पक्षांचे नेते आणि शिवसेना आमदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना मंत्री दिवाकर रावते इतके संतापले की त्यांनी थेट सभापतींच्या कार्यालयात जाऊन निषेध व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, जवानांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते.
पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते.
दरम्यान, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेतून निलंबित करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
-अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं
-पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचं जागा वाटप ठरलं!
–महाराष्ट्रसाठी संतापाचा दिवस, जवांनांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आ. परिचारकांचे निलंबन मागे
-भारत-पाकिस्तानसाठी लवकरच खुशखबर- डोनाल्ड ट्रम्प
–इमरान खान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, शांततेसाठी अभिनंदन यांनाही सोडण्याची तयारी?
Comments are closed.