बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा पाहा 111 सेकंदात; पाहा व्हिडीओ

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाले आहे. या निमित्तानं शिवसेनेनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनेनं सरकारनं 100 दिवसांमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. शिवसेनेनं आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नवा महाराष्ट्र दाखवत असून तुम्ही सज्ज आहात का? असा सवाल सुरूवातीला यात करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज्यातील सरकारनं आतापर्यंत कोणते मोठे निर्णय घेतले हे सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काल अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आपण 100 दिवसांत काय केलं याची माहितीही शिवसेनेनं आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

शिवभोजन थाळी, शेतकरी कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, मुंंबई नाईट लाईफ, महिला सुरक्षा त्यासोबत अर्थसंकल्प हे सर्व व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे वचन दिलं होतं ते सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांतच हे सरकार त्या वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असं यामध्ये दाखवण्यात आलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला- निलेश राणे

“आमच्या आंदोलनामुळेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी”

महत्वाच्या बातम्या-

YES बॅंकेवर निर्बंध येण्याआधी गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी!

सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून दु:ख वाटतं- गुलजार

भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका- अयातुल्ला खामेनी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More