बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?, हा तर धक्कादायक विनोद”

मुंबई | शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर टीका केली आहे. ‘सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका. अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? ती देखील पश्चिम बंगालसारख्या राज्यातील निवडणूक सत्ताधारी पक्षाने, प्रामुख्याने पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेली असताना?’ असा सवाल शिवसेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे.

निर्णय नजरचुकीने जाहीर झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात. हा तर ‘धक्कादायक विनोद’ म्हणावा लागेल. एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? अर्थमंत्री मॅडम, तुम्ही ‘नजरचूक’ दुरुस्त केली हे ठीक, पण जो ‘बूंद से गयी…’ त्याचे काय?, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

‘सामान्य माणूस अल्पबचत योजनांमध्ये एका विश्वासानं गुंतवणूक करतो. त्या व्याजाचे गाठोडे छोटेसेच असते. मात्र, तेसुद्धा तुम्ही रिकामे करायला निघाला होता. निवडणुकांमुळे का होईना, हे गाठोडे सध्या शाबूत राहिले आहे. तर निवडणुका संपल्यावर अर्थमंत्र्यांची ‘नजरचूक’ जनतेच्या ‘खिशावर’ असं होणारच नाही याची खात्री काय?’, असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

दरम्यान, ‘कर्जबुडवणाऱ्या उद्योगपतींना मोकळं सोडायचं आणि इकडे सरकारच्याच अल्पबचत योजनांमध्ये कष्टाच्या कमाईची गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांचे खिसे कापायचे. बँकांचे कित्येक हजार कोटींचे बुडीत कर्ज वसूल करणे राहिले बाजूला आणि अल्पबचत योजनांवरील जेमतेम 5-6 टक्क्यांच्या व्याजावर डल्ला मारायचा. पुन्हा या धोरणात ना अर्थकारण आहे ना राजकारण. असलेच तर हात दाखवून अवलक्षणच म्हणावं लागेल. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी पक्ष, स्वतः पंतप्रधान आणि गृहमंत्री सगळे फंडे वापरून जोर लावत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच या फुग्याला व्याजदर कपातीची टाचणी लावली. या आत्मघाताची जाणीव झाल्यामुळेच अर्थमंत्र्यांनी निर्णय रद्द केल्याचं जाहीर केलं आहे, असही शिवसेनेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे’; पुण्यातील मिनी लॉकडाऊनला भाजपचा कडाडून विरोध

रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

मी भारताचा पंतप्रधान असतो तर…- राहुल गांधी

“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More