बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

मुंबई | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावरून शिवसेनेनं सामनातून उत्तर दिलं. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शिवसेनेने सामना बंद करून, बाबरनामा काढावा, असा सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने खरेदी केलेल्या जमिन व्यवहारामध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली होती. यानंतर भाजप कार्यकरर्त्यांनी शिवसेना भवनाच्या पुढे आंदोलन करण्यास सुरूवात केली. तितक्यात शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी आले आणि त्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली.

दरम्यान, सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापल असून अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

…तर आपल्याला तिसऱ्या लाटेलाही सामोरं जावं लागेल- उद्धव ठाकरे

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More