बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर पुन्हा युती होईल’; रामदास आठवलेंनी सांगितला युतीचा नवा फॉर्म्युला

नाशिक | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांनी तब्येतीच्या कारणावरून घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून राज्यात बऱ्याच दिवसांपासून राजकारण पेटलेलं आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. आता केंद्रीय सामजिक मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathavale) यांनीही यावरून मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी लवकर बरे होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली होतो मात्र, शिवसेनेने भाजपसोबत यावे. फडणवीसांना मु्ख्यमंत्री करावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

आठवले यांनी यावेळी भाजपसोबतच्या युतीवरही भाष्य केलं आहे. येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहणार आहोत. मात्र, युती झाली नाही तर आम्ही लढू. पंजाबमध्ये काँग्रेसने विश्वास गमावलेला आहे. बाबासाहेबांचे संविधान बदलण्यासाठी आणि दलितांचे आरक्षण रद्द करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आले आहे, असं अपप्रचार केला जातोय, असंही आठवलेंनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, आठवले यांनी यावेळी दलित पँथरच्या पुनरूज्जीवनाची गरजही बोलून दाखवली आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. काँग्रेसला अध्यक्ष मिळत नाही. सोनिया गांधी टेम्पररी अध्यक्ष आहेत. कोणत्याही राज्यात काँग्रेस स्ट्राँग नाही. त्यामुळे निवडणुकीत मागे पडतायेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न बघताय?; मग ‘या’ भागात स्वस्त किमतीत मिळणार 1 bhk फ्लॅट

होम आयसोलेशन रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले..

‘या’ ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

“शरद पवार एसटी महामंडळाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत”

सोनं-चांदी दरात ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More