‘शिवसेनेनं UPAमध्ये यावं मग त्यांनी व्यासपीठावर आपलं मत मांडावं’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सल्ला
मुंबई | यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देऊन त्यांनी नेतृत्व करावं अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. यावर संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सोळावा गडी म्हणून खोचक टीका केली होती. संघाचा कॅप्टन कोण होणार हे टीम बाहेरील खेळाडूने सांगून त्याचा उपयोग होत नाही. असंही फडणवीसांनी म्हटलं होतं.
आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही टोला लगावला आहे. शिवसेना अजून युपीएचा घटक पक्ष नाही, राज्यात आम्ही एकत्र सत्तेत आहोत. शिवसेनेनं यूपीएचा घटक व्हावा आणि मग त्यांनी आपलं मत मांडावं तेव्हा त्यांच्या मतांचा आदर केला जाईल, असा टोला युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुर या ना त्या कारणाने उघड होत असतानाच काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी शिवसेनेवर टीका केल्याने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येत आहे. याचा फायदा विरोधी पक्षांना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्यांचं भांडवलं करून सरकारवर टीका करण्याची मोठी संधी विरोधी पक्षाला मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्यजित तांबे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत, या दौऱ्या दरम्यान आज त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर खोचक टीका केली आहे. ‘शिवसेनेनं यूपीएमध्ये यावं मग त्यांनी व्यासपीठावर मत मांडावं, तेव्हा त्यांच्या मतांचा आदर केला जाईल.’ अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आपलं मत व्यक्त केलं.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!
माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल
…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी
अरे बापरे! रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आदळला पक्षी, पाहा व्हिडीओ
पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.