मुंबई | सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीका केली. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करु नये, असा इशारा अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेना हा पक्ष UPA मध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी UPAच्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
दरम्यान, देशात विरोधी पक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणत त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधला होता.
थोडक्यात बातम्या-
अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी
‘या’ अटीशर्तींसह शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार!
भारतात पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ लाख लोकांचे लसीकरण होणार
“…तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचं कौतुक”
“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”