मुंबई | देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यावरुन शिवसेनेनं केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलवर मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर त्यावेळी 2 रुपयांनी कमी केले असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”
क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का; कंगणाचा रोहितला रिप्लाय
“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”
“माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही”
हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत- संजय राऊत