पुणे महाराष्ट्र

“औरंगाबाद नामांतराच्या मुद्दावरून शिवसेनेनं राजकारण न करता ठाम भूमिका घ्यावी”

पुणे | औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झालं नसल्यानं भाजप आणि मनसे यांच्याकडून टीका करण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत औरंगाबाद शहराच्या नामांतर विषयावर भाष्य केलं. शिवसेनेनं याविषयात राजकारण करू नये, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पुणे पालिकेत याबाबतचा ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मी या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय घेतला- शिवराज सिंह चौहान

हाडे गोठवणाऱ्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू

महत्त्वाची बातमी! पुण्यातल्या शाळा आजपासून सुरू

…तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही- चंद्रकांत पाटील

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या