बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्याने राणेंना केंद्रात मंत्रिपद”

मुंबई |  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाडमधील पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. रत्नागिरी पोलिसांनी राणेेंना अटक केली आहे. संपुर्ण राज्यातून राणेंवर टीका होत असताना आता शिवसेेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनाही राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्याने राणेंना केंद्रात एवढं मोठं पद दिलं आहे. भाजप काहीही करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच देवेंद्र फडणवीस काही तासांसाठी मुख्यमंत्री बनले होते. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ करून सेना-भाजप सरकार बनवण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळेच लोकांच्या मनात क्रोध आहे, अशी बोचरी टीका चतुर्वेदी यांनी केली आहे.

नारायण राणेंचे 2019 पासून 2021 पर्यंतचे वक्तव्य जर ऐकलीत तर त्यांनी केवळ शिव्या दिल्या आहेत. चरित्रहनन आणि वैयक्तिक टीका त्यांनी केली आहे. संविधान आणि संवैधानिक पदाची मर्यादा भाजप नेत्यांकडून राखली जात नाही. आपण सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करत असाल तर मर्यादा पाळणं केवळ सर्वसामन्य जनतेचंच काम नाही, असंही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या विरोधात ज्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरदूर करण्यात आली आहे. मात्र 7 वर्षापेक्षा शिक्षा असेल तर पोलिसांना थेट अटक करता येत नाही, त्यांना ही अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही योग्यवेळी दाद मागू असं राणेंचे वकिल अनिकेत निकम यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

70 वर्षात जे कमवलं होतं, ते सर्व मोदी सरकारने विकलं- राहुल गांधी

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या गुप्त हालचाली; भेटीगाठीनं जगाच्या भुवया उंचावल्या

भाजपचा मोठा निर्णय! राणेंच्या अटकेनंतर ‘या’ नेत्याकडे जनआशीर्वाद यात्रेचं नेतृत्व

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More