बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल’, संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले

मुुबंई | राज्यात सत्तापालट झालं पण आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शनिवारी भाजपची (BJP) कार्यकारणी बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावेळी भोंगा-लाऊडस्पीकर बंद करण्यासाठी सत्तापरिवर्तन हवं होतं असं वक्तव्य केलं होतं. याला शिवसेना (Shivsena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर आहोत. हा शिवसेनेचा लाऊडस्पीकर आहे. आमच्या लाऊडस्पीकरचा आवाज तुमच्या पिपान्यापेक्षा जास्त होईल. आम्ही परिणामांची काळजी करत नाही. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेला प्रंचड प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद बघून अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. राज्यात चोऱ्यामाऱ्या करुन सत्ता मिळवली. ती जास्त काळ टिकणार नाही. शिवसेनेच्या अश्रुत हे सरकार वाहून जाईल, असा टोला राऊतांनी शिंदे सरकारला लगावला.

भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भाजपमध्ये नेत्यांना मन मोकळं करता येत नाही. एक चंद्रकात पाटील तेवढे कोल्हापुरचे आहेत म्हणून त्यांनी हिम्मत दाखवली. चंद्रकांत पाटलांच्या पोटात मळमळत होती ते ओठावर आलं. पाटलांच्या एकनाथ शिंदेना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद दिलं या वक्तव्यावर राऊतांनी हा टोला लगावला.

दरम्यान, शिवसेनेचा लाऊडस्पीकर शिंदे गटाला बधीर करेल. भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकरमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. एक महिन्यापासून राज्यात ‘एक दुजे के लिये’ सिनेमा सुरू आहे तो थांबवा. आधी सरकार स्थापन करा. देवेंद्र फडणवीस मला तुमची सगळी प्रकरणं माहित आहे. मला अटकेची भिती दाखवू नका. मी घाबरणार नाही, असा थेट इशारा त्यांनी फडणवीसांना दिला.

थोडक्यात बातम्या

नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

सध्याच्या राजकारणावर नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More