बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पीठ से निकले.. खंजरों को गिना जब…’; संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत

मुबंई | शिवसेना आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवशी पाच धक्के ठाकरेंना बसले आहेत. शिंदे यांनी सोमवारी शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली होती. तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनीही गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिंदेच्या बंडानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. सामनातून, ट्विटरवरून बंडखोर आमदारांना बोलण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. पीठ से निकले… खंजरो को गिना जब, ठीक उतनेही थे, जित्नोको गले लगाया था…! जय महाराष्ट्र, असं ट्विट् (Tweeet) राऊतांनी केलं आहे. यात त्यांनी बंडखोरांना टोला लगावल्याचं स्पष्ट समजत आहे.

उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांसह भाजपवर निशाणा सलाधला. माझ्या भात्यातील बाण काढा पण माझ्याकडे धनुष्य आहे. तो बाण मारण्यासाठी तुम्हाला लागेल. हे दावा करणारी शिवसेना माझ्याकडेही आहे. आमची जनता देशद्रोही नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

एकीकडे शिवसेनेला धक्का बसत आहे. तसेच शिंदे यांची बाजू प्रबळ होत आहे. हे आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. आता राऊतांच्या या आरोपाला शिंदे गटातून कोणती प्रतिक्रिया येते, का? हे पाहावं लागेल.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले…

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”

“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More