बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘2014 नंतरचं स्वातंत्र्य हे असं आहे…’; शिवसेनेचा मोदींना सणसणीत टोला

मुंबई | काल संसदेत झालेल्या गदरोळनंतर 12 खाासदारांचं निलबंन करण्यात आलं. यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये शिवसेनेच्या 2 खासदारांचा देखील समावेश होता. याच मुद्द्यावरून शिवसेनेने (Shivsena) केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. सभागृहात करण्यात आलेल्या खासदारंच्या निलंबनावरून शिवसेनेने सामनाच्या आग्रलेखातून (Saamna Editorial) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘लोकशाही मृत पडली आहे व मुडद्यावर अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरु आहे. पण या कर्मकांडातून निदान संसदेला तरी दुर ठेवायला हवे होते,’ असा टोला लगावून पुढे, ‘मागच्या दोन अधिवेशनात गोंधळ, हाणामारीत कृषी कायदे मंजूर केले. तेव्हाही धड चर्चा घडू दिली नाही’ असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

संसदीय लोकशाहीत चर्चेला महत्त्व आहे. पण सध्या संवाद आणि चर्चेचं महत्त्व संपवण्यात आलं आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने तीन कृषी कायदे कोणत्याही चर्चेशिवाय रद्द केलं. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात पहिल्याच दिवशी हे घडावं यासारखं दुर्दैव नाही, अशी खंत सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सामनामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संविधानाची हत्या झाल्याचा देखील आरोप केला आहे. याशिवाय सामनामधून अभिनेत्री कंगणा रनौतला देखील टोला लगावण्यात आला आहे. सामनामध्ये 2014 नंतरचं स्वातंत्र्य हे असं आहे, असं म्हणत कंगणाने केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More