मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
कोरोना काळात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ट्रम्प यांच्या जागी बायडेन आले. कोविडने जगातील मोठ्या लोकशाहीप्रधान देशाची निवडणूक थांबली नाही. आपण संसदेचे चार दिवसांचे हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही, असं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.
अमेरिकेने निवडणूक घेतली आणि लोकशाही मार्गाने सत्तांतर घडवलं. ही महासत्तेची लोकशाही; आम्ही लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाच टाळे लावले!, अशी टीका राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी लोकांना कोरोनाशी लढण्याची प्रेरणा देत आहेत. पण स्वतःवर येते तेव्हा मैदानातून पळ काढत असल्याचा टोलाही अग्रलेखातून केंद्र सरकारला लावला आहे.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून काँग्रेस नेते राहूल गांधी ‘ती’ बैठक अर्धवट सोडून गेले
आता मला सगळेजण म्हणतात तु आयुष्यात काहीतरी करून दाखवलंस- राखी सावंत
धक्कादायक! ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर
तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार