Top News राजकारण सिंधुदुर्ग

कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य

सिंधुदुर्ग | भाजपा नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अकरापैकी एकही आमदार निवडून येणार नाहीत. सगळ्यांना घरी बसवणार आहे.

“शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्या बळावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले नाहीत. जर ते बाहेर पडले तर तुमचे किती आमदार असा प्रश्न त्यांना विचारला जाईल या भीतीने ते पिंजऱ्यातून बाहेरच पडतच नाहीत,” अशी टीकाही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीये.

राणे पुढे म्हणाले, “शिवसेनेचे आमदार विधानसभेत बोलले नाहीत तरीही कोकणचा विकास थांबवायचा नाहीये हे आम्ही ठरवलंय. कोकणातील विकासाला चालना ही मिळालीच पाहिजे.”

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या