बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली- संजय राऊत

जळगाव | भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना-भाजप यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडताना दिसतात. मात्र अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी युतीमध्ये असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिल्याचं खळबळजनक वक्तव्य दिलं आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं. सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.  जळगावमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची असल्याचंही राऊत म्हणाले.

पाच वर्षे सत्तेत होतो पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी केलेल्या या आरोपावर भाजप काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात, पण ‘या’ 6 जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

“‘या’ राज्यातील भाजपचं सरकार जाणार हे नक्की”

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More