बिहार | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेनेचं चिन्हावर शिक्कामोर्तब झालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा असं चिन्ह दिलंय.
यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं होतं. मात्र त्याला शिवसेनेने नापसंती दाखवत चिन्ह बदलून देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली होती.
दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिलंय. तर निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी
…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले
‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं
…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत