बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा संभाजीराजेंना जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या 57 खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाराष्ट्रात 10 जून रोजी मतदान होणार आहे.

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षांनी मदत करावी, असं आवाहन स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजेंनी (Chatrapati Sambhajiraje) गेल्या आठवड्यात केलं होतं. संभाजीराजेंच्या या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद देखील दिला होता. मात्र, आता शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजेंना मोठा धक्का दिला आहे.

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. शिवसेनेचा हा निर्णय संभाजीराजेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, राज्यातील बदललेल्या समिकरणांनुसार भाजपचे दोन उमेदवार व शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. मात्र, उर्वरीत सहाव्या जागेवर दावा सांगत शिवसेनेने राज्यसभेसाठी दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे संभाजीराजेंचा राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘स्मृती ईराणींवर केलेला हल्ला भ्याड, आता आम्हीही…’; देवेंद्र फडणवीस संतापले

धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

‘सभा करायच्याच असतील तर…’; दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना आव्हान

‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार

“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More