बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवणारच”

सिल्वासा | राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रीय राजकारणात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेचा राजकीय आलेख उंचावताना दिसत आहे. अशातच दादर नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आपल्या पुर्ण ताकदीनीशी उतरली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिल्वाला येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार टीका केली आहे.

दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना मोहन डेलकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. मोहन डेलकर यांनी अनेकवर्ष दादर नगर हवेलीचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं होतं. आता त्यांच्या पत्नीच्या रूपानं शिवसेनेला प्रबळ उमेदवार मिळाल्यानं शिवसेनेच्या तोफा दादरमध्ये धडाडत आहेत. महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

दादार नगर हवेलीची निवडणूक ही केवळ निवडणूक किंवा मोहिम नाही तर  हुकुमशाही आणि अन्यायाच्या विरोधात आवाज नेन्याची मोहिम आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जनतेचा पाठिंबा बघता दादर नगर हवेलीवर नक्कीच शिवसेनेचा भगवा फडकणार हा विश्वास मला वाटत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत व्यासपिठावर खासदार संजय राऊत आणि कलाबेन डेलकर उपस्थित होते.

दरम्यान, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर भावनीक राजकारण करण्याचा आरोप केला आहे. भाजप आणि शिवसेना पहिल्यांदाच राज्याबाहेर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून येवढ्या ताकतीने निवडणूक लढवत आहेत. शिवसेना आपली सगळी ताकत लावून हि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.

थोडक्यात बातम्या 

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

“टीकाकारांनी टीका केली पण स्वत: सरकारनेच उत्तर दिलंय”

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More