‘…तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये’, शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर सुरू झालेलं सत्तानाट्य आता सर्वोच्च न्यायलयात जाऊन पोहोचलं आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेकडून पहिला युक्तिवाद केला जात असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये, अशी मागणी अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे.
आमदारांची अपात्रता आणि फ्लोअर टेस्ट या दोन गोष्टींचा संबंध काय? असा सवाल यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. तर आज बहुमताची नोटीस आली आणि उद्या बहुमतासाठी बोलावलं. हा खूप कमी वेळ आहे, असं देखील सिंघवी म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्हाला अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. काही आमदार विदेशात आहेत तर काहिंना कोरोनाची लागण झाली आहे, असं म्हणत सिंघवी फ्लोअर टेस्टसाठी वेळ मागून घेत आहे. त्यामुळे राज्यातील एकंदर घडामोडी बघता सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात
एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार, राजकीय हालचालींना वेग
सुरक्षेशिवाय अजित पवार दोन तास गायब, मंत्रिमंडळात खळबळ…
संजय राऊत आजपासून बोलणं बंद करणार, कारण सांगत म्हणाले…
मोठी बातमी! राज्यपालांनी दिलेले ‘हे’ 6 आदेश काढू शकतात ठाकरे सरकारची विकेट
Comments are closed.