बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेची एन्ट्री; ‘इतक्या’ जागा लढवणार

लखनऊ | उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्याच्या राजकीय हलचालींना आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. अशातच आता उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करण्याचा मोठा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यासंदर्भात शिवसेना उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी पत्रक जारी केलं आहे.

शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकांसाठी शिवसेनेनं अजून कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. शिवसेनेनं ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, शिवसेना उत्तर प्रदेशातील निवडणुक लढवण्याच्या निर्णयावर भाजपची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटतील हे पाहणंही तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

“कोणत्याच भूमिकेवर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास”

गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार?, ‘या’ पाच नावांची जोरदार चर्चा

गीता समोताची ऐतिहासीक कामगिरी; आफ्रिकेतील 16000 फूट उंच किलीमंजारो शिखर केला सर

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

कोरोनातून बरं झालेल्यांच्या ‘या’ अवयवावर होतायेत गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More