मुंबई | मुंबईसह पुण्यात आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आयकर विभागाने मुंबईसह राज्यभर 26 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये राज्यातील शिवसेनेचा नेता आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समोर आलं आहे.
दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने 2017 साली जमीन खरेदी केली होती. 1 कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. या 1 कोटी 10 लाख रूपयाच्या व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली होती. या जमीनीवर 2017 ते 2020 दरम्यान या अलीशान रिसॉर्ट बनले गेले होते. या नंतर अधिकृतरित्या ही जमीन त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली.
मुंबईतील एका केबल व्यावसाईकाला ही जमीन रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर विकण्यात आली होती. पण फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या रिसॉर्टवर 6 कोटी खर्च करण्यात आले होते. एका सरकारी अधिकाऱ्यावर टाकलेल्या छाप्यात ही मोठी बातमी समोर आली आहे.
दरम्यान, युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, आरटीओ अधिकारी बजरंग खमाटे, शिवसेना पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक सदानंद कदम, आणि एका सीएवर आयकर विभागानं याच्यावर धाड टाकली आहे.
थोडक्यात बातम्या-
आनंद महिंद्रांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, वाचा नेमकं कारण काय?
नवाब मलिकांना सोडविण्यसाठी मागितली ‘इतक्या’ कोटींची लाच, मलिकांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
“महाराष्ट्रातही आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही”
चहा महागला! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार चहा, वाचा नवे दर
ऑनलाईन क्लासेसचे लहान मुलांवर होतायेत दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ उपाय
Comments are closed.