पुणे | राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना दिसत आहे. त्यातच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
स्वातंत्र्यातलं सगळ्यात मोठं तंत्र लोकतंत्र आपल्या हातात आहे. आपल्या हातात जे माध्यम आहे त्यातून देशसेवा करावी, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद दिसेल. महापालिका निवडणुक एकट्याने लढायची का आघाडी करायची यासंदर्भात निर्णय आत्ताच घेता येणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीलाही शिवसेनेने जोरदार दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुळशीतील गटबाजीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपण तळागाळापर्यंत प्रामाणिक काम करायचे आणि काही संधीसाधूंनी केवळ आयत्या पीठावर रेघोट्या ओढायच्या, असं म्हणत शंकर मांडेकर यांनी रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजपचे अमोल शिंदे, घोटावडचे संदीप खानेकर, रामकृष्ण ससार तसेच अन्य काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शंकर मांडेकर यांनी यापुर्वी शिवसेना तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. मांडेकर यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे मी आज जिवंत आहे”
“मी पहाटे 5 वाजता उठूनही काम करायला तयार पण…”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार
Comments are closed.