बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

मुंबई | केंद्रीय मंत्री म्हणून राणे यांनी आज शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही, असं अनिल देसाई म्हणालेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणेंनी व्यक्त केलाय.

दरम्यान, कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजप मजबूत करण्यासाठी राणे यांना बळ देण्यात आल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावरही राणेंनी भाष्य केलं कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की, असं राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन!

एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढलं, या मंत्र्याची रेल्वेमंत्रिपदी वर्णी

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आभारी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More