बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

अमरावती | खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अखेर उच्च न्यायालयामार्फत रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जात प्रमाण रद्द केल्यावर अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला.

राजकमल चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेने जल्लोष केला आहे. वडिलांचं सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर आजोबांच्या नावाने खासदार नवनीत राणा यांनी सर्टिफिकेट बनवलं होतं.

उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी कॉन्स्टिट्युशन फ्रॉड केल्याचं म्हणत त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

दरम्यान, अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. त्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांच्यानंतर दुसरा नंबरला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ होते. त्यामुळे खासदारकी रद्द झाली तर अडसूळ यांना खासदारकी मिळण्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

आनंदाची बातमी! ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झालं सोनं; वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

मोदी-ठाकरे भेट! पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ‘या’ 12 मुद्यांवर चर्चा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More