बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा मनसेला दे धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच मनसेला मोठी खिंडार

औरंगाबाद | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने देखील कंबर कसली आहे. अशातच आता औरंगाबाद निवडणुकीआधी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील आठवड्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेने मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मनसेचे अनेक पदाधिकारी फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला आहे.

दरम्यान, पक्षप्रवेशावेळी सुभाष देसाई यांनी मनसे आता गळकं घर झाला असून, शिवसेना चिरेबंदी वाडा झाला असल्याची टीका मनसेवर केली आहे. आता स्वत: राज ठाकरे औरंगाबादमध्ये लक्ष घालत असल्याने आता मनसे यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

छोटू भोयर काँग्रेसवर नाराज? म्हणतात, “…यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो”

रायगडावर संशयास्पद हालचाली! शिवप्रेमी म्हणाले,”यांची थोबाडं रंगवा”; पाहा व्हिडीओ

“स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात”

Omicron रूग्णांमध्ये सापडतात ‘ही’ एकसारखी लक्षणं; तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय हे कसं समजणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More