बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यात काहीच तथ्य नाही; आर्यन खान निर्दोष, त्याला गोवलं जातंय”

मुंबई | देशभरात मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित क्रुझ ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहे. अभिनेता शाहरूख खान मुलगा आर्यन खान आणि त्याच्या काही साथीदारांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी शाहरूख खान प्रयत्न करत आहे. अशातच शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन खानच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात निर्दोष आहे.त्याला गोवलं जातंय, त्यामुळं त्याची या प्रकरणातून सुटका व्हावी, अशी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली आहे. एकीकडे 3 हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई आणि बॉलिवूडला धरून एनसीबी कारवाई करत आहे. त्यात काहीच तथ्य नाहीत, असं तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

एनसीबी ही एक संविधानिक संस्था आहे. त्यात एनसीबी ही आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यन खानची केस ही अत्यंत शुल्लक आहे. त्या केसमध्ये काहीच रिकव्हरी नाही. तसेच पझेशन नाही. आर्यनला फक्त 24 तासांसाठी अटक करण्यात आलेली आहे. नंतर त्याला वेगवेगळ्या कारणावरून पेडलर ठरवण्यात आलं. त्यामुळं या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला जामीन मिळणं त्याचा अधिकार आहे, असं किशोर तिवारींनी म्हटलं आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी दरम्यान युक्तीवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. त्यामुळं आर्यनला जामीन मिळणार का नाही? हे येत्या 20 ऑक्टोबरलाच समजणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

“राहुल गांधींना ड्रॅग्जचं व्यसन, ते ड्रॅग्ज तस्करी देखील करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More