बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

मुंबई | पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी (Expulsion) करण्यात आली, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक (Preass Realse) काढून देण्यात आली होती. यावर आता शिवसेनेने स्पष्टीकरणं दिलं आहे.

हे पत्रक अनावधानाने छापण्यात आलेलं असून श्री. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या उपगटनेतेपदीच असतील, अशी माहिती आता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून देण्यात आली आहे.

निलंबनाची माहिती कळताच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले ” एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपदाची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं होतं. यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मुंबईत भेटण्याचे ठरलं होतं. अचानक सकाळी निलंबनाच्या बातमीने मी अचंबित आहे”

दरम्यान, यानंतर शिवसेनेने नवीन पत्रक प्रसिद्ध करून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या उपगटनेतेपदीच असतील असं जाहिर केलं.

थोडक्यात  बातम्या

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”

“मी सुद्धा बऱ्याचदा मुख्यमंत्री झालो पण मला कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवलेलं आठवत नाही”

मोठी बातमी! महाविकास आघाडीला आणखी एक झटका

‘…तर एकनाथ शिंदे यांनी हे आधीच केलं असतं’; जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More