बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्कवर होत असतो. पण मागील वर्षी कोरोनाचे गंभीर संकट असल्याच्या कारणानं हा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला नाही. यावर्षी दसरा मेळावा हा कोरोनाचे नियम पाळून षन्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडत आहे.

या वर्षी हा मेळावा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. सर्व शिवसैनिक हे मला बाळासाहेबांनी दिलेले आहेत. हेच माझे आजचे विजयादशमीचे शस्त्र आहेत. तसेच शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा जाणार नाही. कारण, मला माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार केले आहेत. काहीजण ठाकरे कुटूंबाची बदनामी करत आहेत. त्यांना आपण तिथेच ठेचून काढू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान, जर स्वत:हा मध्ये हिंमत असेल तर भाजपने स्वबळावर द्यावेत. पोलिसांच्या आडून मी आवाहन देणार नाही. मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाजपला आवाहन देत आहे. यंत्रणांआडून कारवाई करणारे आम्ही नामर्द नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

“सूरज सा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझको कब तक रोकोगे”

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More