मोठी बातमी! शिवसेनेची संपत्ती आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | निवडणूक आयोगाने (Election Commision) ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर दादरचे (Dadar) शिवसेना भवन आणि शिवसेनेची संपत्ती देखील शिंदेंना मिळणार का?, असा प्रश्न सर्वांना पडलाय. अशात शिवसेनेच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Association for Democratic Reforms म्हणजेच ADR अहवालानुसार, शिवसेनेकडे 2020-21 मध्ये 191 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती. आता एकनाथ शिंदे ज्यांना खजिनदार करतील त्यांच्या स्वाक्षरीने या निधीचे व्यवस्थापन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जर हा निधी एकनाथ शिंदे यांच्यांकडे गेला तर उद्धव ठाकरे यांना पक्ष चालवण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

महाराष्ट्रात 82 ठिकाणी शिवसेनेची मोठी कार्यालये आणि मुंबईत 280 छोटी कार्यालये आहेत. आता या कार्यालयांचा ताबा घेण्यासाठी दोन्ही गटात जोरदार लढाई जुंपणार आहे. काही ठिकाणी त्याला सुरुवात देखील झाली.

दरम्यान, याबाबत ज्येष्ठ कायदातज्ज्ञ श्रीहरी अणे यांना विचारलं असता त्यांनी कायदेशीर बाजू स्पष्ट केल्या. ते एबीपी माझाशी बोलत होते.

शिवसेना पक्षाचा निधी असेल, तर तो निधी शिंदे गटाला जाईल. कारण पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ते बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार आज तरी शिंदे गटाला आहेत. त्यामुळे शिंदे गट अर्ज करून तो निधी आमच्याकडे वर्ग करा अशी मागणी करू शकेल. तसेच त्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी नेमेल, असं

महत्त्वाच्या बातम्या-