शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याची प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद | शिवसेनेचा तालूकाप्रमुख असणाऱ्या एका तरुणाने प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे घडली आहे. सदर तरुण ग्रामपंचायतीचा सदस्य देखील आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण आत्महत्या सांगण्यात येत असले तरी नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
सुनिल खजिनदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन तो दौलताबाद पोलिस ठाण्यासमोर आणून ठिय्या मांडला आहे. घातपातचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तणावाच्या पार्श्वभूमीवर दौलताबादमधील दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रातील लाॅकडाउनसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
‘रात्री 11 पर्यंत न थकता काम, काय खाता?’; अभिनेत्याचा किशोरी पेडणेकरांना सवाल, म्हणाल्या…
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली”
…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ
एक डाव लग्नाचा! पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबतच रंगवली रात्र
Comments are closed.