चर्चा तर होणारच ना; फिनालेपूर्वीच शिव ठाकरेला लागलीय मोठी लाॅटरी

मुंबई | बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. त्यातच हिंदी बिग बाॅस सीझन 16 चे ग्रॅंड फिनाले जवळ आल्यानं विनर कोण ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टाॅप ५ मध्ये शिव ठाकरे(Shiv Thakare), प्रियंका चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि शालिन भानौत आहेत. या पाचजणांपैकीच एकजण विनर ठरणार असल्यानं सोशल मीडियावर याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.

शिव ठाकरेचे चाहते तर सोशल मीडियावर शिव ठाकरेच विनर होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. या सगळ्यातच शिवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे.

शिवला कलर्स वाहिनीवरील एक मोठा शो ऑफर झाला आहे, अशा चर्चा आहेत. शिवला रोहीत शेट्टीचा(Rohit Shetty) खतरों के खिलाडी(Khatron Ke Khiladi) हा शो ऑफर झाला आहे. परंतु याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, शिव ठाकरे हा मराठी बिग बाॅसचा विनर ठरलेला आहे. त्यामुळं हिंदीमध्येही तोच विजयी होईल असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. परंतु विनर कोण ठरेल हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनाच उद्याची वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More