EX गर्लफ्रेंड वीणाबाबत शिव ठाकरेचा खुलासा म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | नुकताच हिंदी बिग बाॅस 16 चा सिझन पार पडला. या सीझनचा विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र स्टॅनची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासोबतच या सिझनचा रनर अप शिव ठाकरेची देखील चर्चा सुरु आहे. अशावेळीच शिवनं त्यांची गर्लफ्रेंड वीणा जगताप हिच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे.

शिव ठाकरे मराठी बिग बाॅस (Big Boss) सिझन 2 चा विजेता ठरला आहे. शिव त्याच्या खासगी आयुष्यामुळं देखील नेहमीच चर्चेत असतो. नुकताच बिग बाॅस मधून बाहेर पडल्यानंतर शिवने त्याची EX गर्लफ्रेंड वीणा जगताप (Veena Jagtap) हिच्याबाबत भाष्य केलं. एका मुलाखतीत तो बोलत होता.

यावेळी तु आणि वीणा एकमेकांशी बोलता का? असा प्रश्न शिवला विचारण्यात आला होता. मराठी बिग बाॅस असो किंवा हिंदी बिग बाॅस 16 असो दोन्हीमध्ये बनलेली नाती माझ्यासाठी खास आहेत. मला कोणत्याही गोष्टीबद्दल खंत नाही. मी जे केलं ते मनापासून केलं,असं उत्तर शिवनं (Shiv Thaker) दिलं आहे.

मी आणि वीणा रिलेशनशिपमध्ये नसलो तरी बिग बाॅस 16 मध्ये येण्यापूर्वी मी तिच्याशी बोललो होतो,असंही तो पुढं मुलाखतीत म्हणाला. दरम्यान, बिग बाॅस मराठी सिझन 2 मध्ये शिव आणि वीणाची लव्हस्टोरी पहायला मिळाली होती. काहीकारणास्तव त्यांच ब्रेकअप झालं.

महत्त्वाच्या बातम्या