जालना | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या एका कार्यक्रमात दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. जालन्यातील आर्य समाज मंदिरात भिडेंची बैठक सुरु होती. हा सर्व प्रकार रविवारी सकाळी घडला.
कार्यक्रमस्थळी विरोधी कार्यकर्ते एकत्र आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकार्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.
गेल्या आठ दिवसांपासून भिडेंच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती फिरत होती. संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांचा या कार्यक्रमाला विरोध होता.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंना अज्ञातस्थळी घेऊन गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी संदर्भात आज होणार महत्वाची बैठक
-युतीसाठी भाजप-शिवसेना यांच्या गुप्त बैठका
-ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की; भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी
-“2014 चं मोदी वादळ सरलं आहे, लाटेत पाणीच उरलं नाही”
-उत्तर प्रदेशात मोदींसाठी धोक्याची घंटा, अखिलेश आणि मायावती आले एकत्र
Comments are closed.