मुंबई | प्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे आपल्या वृक्षपरोपनाच्या मोहिमांनी समाजात अभिनेत्यासोबतच वेगळं असं स्थान तयार केलं आहे. अशातच सयाजी शिंदेंनी महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी नवा संकल्प केला आहे.
शिवजयंतीला प्रत्येक गडावर 400 झाडं लावण्याचा संकल्प सयाजी शिंदेंनी केला आहे. याबाबत सयाजी शिंदे यांच्या फॅनपेजवर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी 400 झाडं लावण्याच्या संकल्पाबद्दल सांगताना दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असं आवाहन सयाजी शिंदेंनी सर्वांना केलं आहे. सयाजी शिंदे स्वत: शिवजयंतीला पन्हाळगडावर वृक्षारोपनासाठी जाणार आहेत.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त गडावर मशाल घेऊन जाऊ पण हिरवी मशाल, झाडांची मशाल, कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही, असं सयाजी शिंदेंनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
डोक्यात गोळी मारत गोल्डमॅनला संपवलं, दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार!
“भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय”
टाटा देतंय भन्नाट ऑफर!! आता 80 हजारात आणा ही कार..
“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात”
आता मोदींनाच विचारायला हवं खरे मोदी कोण?- छगन भुजबळ