बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे.

तुमच्या नेत्यांना जी मंत्रीपद मिळाली, ती शिवसेनेमुळंच मिळाली आहेत असं मी सुद्धा म्हणू शकतो. पण माझा मुजोरपणा नाही. कारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या संगनमताने हे सरकार चाललेलं आहे. तेव्हा तुम्ही जास्त आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला, अशी घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.

भांडणं आमच्या दोघांची आहेत. यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे कुठून आले. माझं अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी नेत्यांशी चांगलं जुळतं. पण हे दोघे हवेत आहेत. ह्यांना वाटतंय राज्य सरकार ह्यांच्यामुळं चालतंय. अमोल कोल्हेंनी हे विसरू नये की त्यांना प्रकाश झोतात आणण्यात केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात आहे, असंही आढळराव पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसंच अमोल कोल्हे यांचे आज झालं, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, असं म्हणत शिवसेना नेते आणि प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शरद पवारांनी एनडीएत यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं”

मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचं स्थलांतर करा- उद्धव ठाकरे

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More