नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. त्यावेळी संपूर्ण देशवासियांना संबोधताना मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे शक्य नाही. परंतू सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात.
शिवाजी महाराज एक आदर्श शासक, सत्य व न्यायेचा योद्धा, उत्तुंग शौर्य आणि असामान्य बुद्धिमत्ता असणारे भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज कायमच ऊर्जास्त्रोत राहिले आहेत. जय शिवाजी! अशा शब्दात मोदींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज देशवासियांचे प्रेरणास्रोत राहिले आहेत. महाराजांची प्राथमिकता जनतेचं संरक्षण आणि राष्ट्रची सुरक्षितता होती. त्याच तत्वांप्रमाणे संस्कारांप्रमाणे सरकारने राष्ट्र रक्षा आणि राष्ट्रवादाला प्राथमिकता दिली असल्याचं नरेेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराजांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सशस्र सेनेला प्राधान्य दिलं होतं . त्याकाळात शिवाजी महाराजांनी नौसेनेची बांधणी केली होती. त्यामुळे सरकारने भारताच्या लष्कराला जगातील बाकीच्या शक्तिशाली लष्कराच्या श्रेणीत उभं केलं आहे. रोज एक सेवेचं काम जर आपण सर्वांनी केलं तरी शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला देश सेवेच्या माध्यमातून घडवू शकतो, असंही मोदी म्हणाले.
मां भारती के अमर सपूत छत्रपति शिवाजी महाराज को उनकी जयंती पर शत-शत नमन। उनके अदम्य साहस, अद्भुत शौर्य और असाधारण बुद्धिमत्ता की गाथा देशवासियों को युगों-युगों तक प्रेरित करती रहेगी। जय शिवाजी! pic.twitter.com/3vhVgBYp5R
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2021
थोडक्यात बातम्या –
राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!
परीक्षेला गेलेल्या मुलीचा प्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
आता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट!
मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाठवला तिचा ‘तो’ व्हिडीओ त्यानंतर…